नमस्कार मी मनोज इंगळे उद्योगमंत्र मराठीचा संस्थापक व अध्यक्ष. आजचा ब्लॉग हा खास बनवला आहे, जेव्हा मला फोन येतात किंवा कॉल येतात तर पहिला प्रश्न असतो की सर तुमच्याबद्दल सांगा, आता एवढ्या सगळ्या लोकांना माझ्याबद्दल सांगणं शक्य होत नाही. म्हणून मग मी तुम्हाला हा एक छोटासा कॉमन ब्लॉग त्याच्यामध्ये मनोज इंगळे कोण आहे, उद्योगमंत्र मराठी काय काम करते याबद्दल एक लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
उद्योगमंत्र च्या संस्थापकांबद्दल जाणून घेऊयात
तर माझं नाव मनोज इंगळे. मी अहमदनगर या शहरांमध्ये राहतो माझं शिक्षण एम फार्म झालेला आहे. मी एक सर्टिफाइड फूड ऑडिटर आहे, विवविविध फूड कंपन्यांना ऑडिट सुद्धा मी करतो आणि त्याचसोबत बऱ्याचशा अशा इंटरनॅशनल सर्टिफिकेशन सुद्धा माझ्याकडे आहेत ज्या मी माझ्या नोकरीच्या कालावधीत घेतलेल्या आहेत. आता तुम्ही बोलणार की फार्मा वाला माणूस आणि उद्योगांमध्ये कसं काय तर आपण हे थोड्या वेळातच जाणून घेऊया. आता पुढे बोलूयात…
शिक्षण व अनुभव
मी सांगू इच्छितो की माझं जे कॉलिफिकेशन आहे, फूड सेक्टर मधला माझा जो एक्स्पिरियन्स आहे मी माझा जवळ जवळ जर सांगितलं तर जेव्हा मी पुण्यामधून सिंहगड इन्स्टिटयूट मधून पास आऊट झालो मी नॅशनल केमिकल लॅबोरेटरी मध्ये सुद्धा मी दोन वर्षे काम केले जी सेंट्रल गव्हर्मेंट अंडर लॅब येते . ती पाषाण येथे आहे. अजून एक मल्टिनॅशनल फार्मासिटिकल इंडस्ट्री आहे किंवा फूड इंडस्ट्री आहे त्यामध्ये मी जवळजवळ सहा वर्ष मॅनेजर पदावर होतो. ते शेवटचे माझं पद होतं. माझा जो मेन एक्सपिरीयन्स आहे किंवा अनुभव जो आहे तो असिस्टंट मॅनेजर क्वालिटी इन्शुरन्स या पदावर आहे.
उद्योगमंत्र मराठी ची सुरुवात
दुसरी गोष्ट अशी आहे की मी जे बिझनेस सेक्टर मध्ये मार्गदर्शन करतो तर या मार्गदर्शनाला किती वर्षे झाली ? खरं सांगायचं झालं तर 2020 यावर्षी आपण हा ग्रुप चालू केला होता. जवळजवळ चार वर्ष आपल्याला मार्गदर्शन करून झालेले आहेत. बराच वेळा लोकांचा असा एक प्रश्न असतो की तुम्ही आमच्या बिजनेस बद्दल सांगा, आम्हाला व्यवसायिक उत्पन्न बद्दल सांगा किंवा मला कंपनी बद्दल सांगा, ज्याचा वापर करून आम्हाला व्यवसायामध्ये वृद्धी करता येईल.
अजून सांगायचं झालं तर आम्ही उद्योगमंत्र मराठी सुरू करण्यामागचं काय कारण होतं, जेव्हा मला व्यवसाय मध्ये उतरायचं होतं तर त्या वेळेला असा मला एक गॅप जाणवला की ज्यामध्ये लोकांना व्यवसायिक मार्गदर्शन मिळत नाही. मग आम्ही यातून काय ठरवलं की, आपल्याला जेवढं माहिती आहे, माझ्याकडे जे सर्टिफिकेशन्स आहेत, नॅशनल इंटरनॅशनल लेवल चे जे सर्टिफिकेशन्स आहेत, तर या सर्टिफिकेशन चा आपल्या लोकांना कसा उपयोग होईल, मराठी लोकांना कसा फायदा होईल, कारण आपल्याला तर माहिती आहे धंद्याचे नियम कोणीही एकमेकांना सांगत नाही, तर मी माझे सर्टिफिकेशनचा आपल्या लोकांना कसा फायदा होईल, या दृष्टिकोनाने उद्योग मंत्र मराठी याची स्थापना झाली. आता ज्या वेळेला आम्ही व्यवसायामध्ये उतरलो त्याआधी मी खूप मार्केटिंग एजन्सीज मध्ये स्वतः काम केलेलं होतं. कारण की मी स्वतःच सांगतो एका व्यवसायावर अवलंबून राहू नका. तसंच जेव्हा मी कंपनीमध्ये कामात काम करत होतो तेव्हा या इतर गोष्टी वर सुद्धा करत होतो. माझा फार्म झाल्यावर जवळजवळ दोन वर्ष मी फार्मा मार्केटिंग मध्ये सुद्धा काम करत होतो.
उद्योगमंत्र मराठी ची वैशिष्ट्ये
आता एवढं सगळं झाल्यानंतर एकतर ठरलं होतं की आपल्याला हा एक व्यवसाय म्हणून करायचा आहे. तर त्यासाठी मी काही मोठमोठ्या लोकांचे प्रशिक्षण सुद्धा घेतलेत. लाखो रुपये खर्च करून तुमच्यासाठी मी काही गोष्टी शिकून घेतले आहेत. आता गोष्टी शिकल्याशिवाय दुसऱ्याला शिकवण हे चुकीच आहे. मला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय आणि तुमच्यावर आजमावतोय ही एक चुकीची पद्धत आहे. ती दुसऱ्यांवरती आजमावण्याआधी त्या गोष्टीचा काहीतरी आपल्याला फायदा झाला पाहिजे किंवा त्यासाठी काहीतरी मागचा सपोर्ट किंवा अनुभव पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण उद्योग मंत्राची स्थापना केली केली . आता यातून झालाय असं की आपला परिवार आपण वाढत वाढत जवळजवळ आता पन्नास हजार लोकांपर्यंत आपण पोहोचलो आहे. आता आपण पन्नास हजार लोकांपर्यंत पोहोचलो याचं एकमेव कारण म्हणजे, आपला एक युनिक कंटेंट. आपला कंटेंट हा नेहमी प्रॅक्टिकल असतो, कारण की मी स्वतः एक व्यवसायिक आहे. माझंही रिटेल आणि होलसेल शॉप आहेत. मी काही गोष्टींमध्ये पार्टनर आहे. माझ्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मध्ये दोन तीन कंपनीज आहेत आणि पार्टनरशिप सुद्धा आहेत. आणि याचा मला फायदा असा होतो की मी रोजच्या जीवनामध्ये जे काही शिकतो किंवा ज्या काही अडचणी चा सामना करतो, ते मी तुम्हाला या उद्योग मंत्राद्वारे सांगण्याचा प्रयत्न करतो. हा एक त्याचा मागचा उद्देश आहे.
सेवा व प्रकार
तर उद्योगमंत्र मराठी मध्ये आपण काय काय सर्विसेस देतो, त्याबद्दल बोलायचं जर झालं तर आपण सोशल मीडिया एडवर्टाइजमेंट एजन्सी म्हणून रजिस्टर आहे. आता तुम्हाला सोशल मीडिया रिलेटेड जे काही लागतं फेसबुक अॅड, इन्स्टाग्राम, फॉलोवर्स किंवा ब्रॅण्डिंग करायचं असेल, फ्रॅंचाईजी असेल, वेबसाईट असतील किंवा अजून काही डिजिटल / सोशल मीडिया वर्क असेल, त्यामध्ये बॅकअप हवा असेल तर तुम्हाला तो आपण उद्योग मंत्र मराठीच्या माध्यमाने प्रोव्हाइड करतो. आणि आता शेवटचा जर सांगायचं झालं तर बिजनेस कन्सल्टन्सी किंवा तुमच्या ग्रुप लेवलला किंवा तुमच्या बिझनेस ला काही मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर उद्योग मंत्र मराठी तुम्हाला कन्सल्टिंग पुरवतं.
उद्योगमंत्र मराठी ला संपर्क कधी कराल ?
उद्योगमंत्र मराठी मध्ये आम्हाला जर तुमच्याबद्दल माहिती नसेल, तर आम्ही तुम्हाला अशा व्यक्तींची माहिती देतो, जे तुम्हाला तुमच्या बिजनेस मध्ये मदत करतील किंवा तुम्हाला मार्गदर्शन करतील. या व्यतिरिक्त आपण आता व्यवसायिक प्रशिक्षणे, व्याख्याने, सोशल प्रोग्राम्स यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. तुम्हा सर्वांना मार्गदर्शन मिळावे, हा एक या मागचा हेतू आहे. दैनंदिन किंवा उद्योगाच्या जर्नी मध्ये जर तुम्ही कुठे अडकले असाल, तर तुम्हाला त्यातून बाहेर काढण्यासाठी मार्गदर्शन करणे हा एक उद्देश आहे. त्यामुळे आम्हाला कॉल करायला किंवा कॉन्टॅक्ट करायला घाबरू नका.
तर ही आहे उद्योगमंत्र मराठी आणि मी मनोज इंगळे, माझी एक छोटीशी माहिती आणि माझा हा छोटासा प्रवास… या प्रवासामध्ये जे उद्योजक पहिल्यापासून माझ्यासोबत आहेत, त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि भविष्यात येणाऱ्या उद्योजकांचे सुद्धा आपल्या या उद्योगमंत्र मराठी मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. मला कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुम्ही दहा ते पाच या वेळेत कधीही कनेक्ट करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता.