उद्योगमंत्र मराठी च्या माध्यमातून आरबीआयची “Continuous Cheque Clearing System” — नवीन पद्धत शिकून घेऊयात.

भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील चेक क्लिअरिंग प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी “Continuous Clearing and Settlement on Realization” ही नवी प्रणाली जाहीर केली आहे. ही पद्धत जुन्या बॅच आधारित प्रणालीऐवजी सतत चालणारी क्लिअरिंग प्रक्रिया आणते.

पूर्ण VIDEO पाहण्याआधी उद्योगमंत्र ला फोलो अथवा SUBSCRIBE नक्की करा.

१. या बदलाची गरज –

आजपर्यंत चेक क्लिअरिंग एकत्र बॅच स्वरूपात होत असे. म्हणजेच चेक जमा झाल्यानंतर त्याची प्रक्रिया ठराविक वेळेनंतर होत असे, ज्यामुळे व्यवहारात विलंब व्हायचा.
नवीन प्रणालीत चेक जमा होताच त्याची प्रक्रिया त्वरित सुरू होईल आणि क्लिअरिंग व सेटलमेंट दोन्ही रिअल-टाइममध्ये होतील. त्यामुळे व्यवहार अधिक जलद आणि विश्वसनीय होतील.


२. नवीन प्रणालीचे नाव आणि स्वरूप

या प्रणालीचं नाव आहे Continuous Clearing and Settlement on Realisation.
या अंतर्गत प्रत्येक चेक जमा होताच त्याची प्रतिमा आणि माहिती क्लिअरिंग हाऊसकडे पाठवली जाते आणि पुढील प्रक्रिया तत्काळ सुरू होते.
ही प्रणाली “रिअल टाइम” पद्धतीने काम करणार असल्याने निधी हस्तांतरण काही तासांत पूर्ण होईल.


३. अंमलबजावणीचे दोन टप्पे

  1. पहिला टप्पा – ४ ऑक्टोबर २०२५ ते २ जानेवारी २०२६
  • चेक सादरीकरणाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत.
  • ड्राwee बँकेने सायंकाळी ७ वाजेपर्यंत चेक मान्य किंवा नाकारलेला असल्याची पुष्टी द्यावी लागेल.
  • वेळेत प्रतिसाद न मिळाल्यास चेक आपोआप मान्य मानला जाईल.
  1. दुसरा टप्पा – ३ जानेवारी २०२६ पासून पुढे
  • प्रत्येक चेकसाठी “Item Expiry Time” लागू होईल.
  • म्हणजे चेक प्राप्त झाल्यावर ड्राwee बँकेला फक्त तीन तासांच्या आतच पुष्टी द्यावी लागेल.
  • वेळेत पुष्टी न मिळाल्यास तो चेक आपोआप मंजूर समजला जाईल.

४. प्रक्रिया कशी चालेल

  1. ग्राहकाने चेक जमा केला की तो लगेच स्कॅन होईल आणि क्लिअरिंग हाऊसकडे पाठवला जाईल.
  2. क्लिअरिंग हाऊस त्वरित ती प्रतिमा संबंधित ड्राwee बँकेला पाठवेल.
  3. ड्राwee बँक तो चेक मान्य किंवा नाकारेल.
  4. प्रत्येक तासाला क्लिअरिंग हाऊस निव्वळ सेटलमेंट करेल.
  5. मंजूर चेकसाठी रक्कम सादर करणाऱ्या बँकेला परत मिळेल आणि ग्राहकाच्या खात्यात निधी जमा होईल.

५. महत्त्वाच्या अटी

  • प्रत्येक चेकसाठी निश्चित वेळेत निर्णय घ्यावा लागेल.
  • वेळेत पुष्टी न दिल्यास चेक आपोआप मंजूर समजला जाईल.
  • नाकारलेले चेक सेटलमेंटमध्ये समाविष्ट होणार नाहीत.
  • सर्व बँकांनी त्यांच्या तांत्रिक प्रणाली अद्ययावत ठेवाव्या लागतील.
  • ही प्रणाली देशातील तीनही क्लिअरिंग ग्रिड्समध्ये — मुंबई, दिल्ली आणि चेन्नई — एकाचवेळी लागू होईल.

६. या बदलाचे प्रमुख फायदे

  • चेक क्लिअरिंग वेळ दोन दिवसांऐवजी काही तासांत पूर्ण होईल.
  • व्यवसाय आणि ग्राहकांना निधी पटकन उपलब्ध होईल.
  • व्यवहारातील पारदर्शकता आणि ग्राहकांचा विश्वास वाढेल.
  • फसवणूक नियंत्रणासाठी रिअल-टाइम तपासणी शक्य होईल.
  • बँकिंग प्रणाली अधिक आधुनिक आणि कार्यक्षम बनेल.

Video Link : https://youtu.be/P5CgELxEHa0?si=3PqUDjoUw22alGqV

निष्कर्ष

आरबीआयची ही नवी प्रणाली म्हणजे बँकिंग क्षेत्रातील एक मोठं पाऊल आहे.
चेक क्लिअरिंग आता “दिवसांचा खेळ” राहणार नाही — काही तासात निधी तुमच्या खात्यात दिसेल.
व्यवसायांसाठी तर ही बदलती पद्धत वेग, पारदर्शकता आणि विश्वासाचा नवा अध्याय उघडते.

VIDEO आवडल्यास नक्की शेअर करा.

धन्यवाद .

श्री मनोज इंगळे
उद्योगमंत्र मराठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *