उद्योगमंत्र मराठी वेबसाईट व ब्लॉग्स याची स्थापना मनोज इंगळे यांनी 2020 या वर्षी केली . उद्योगमंत्र मराठी हे सुरुवातीला अहमदनगर येथून कार्यरत झाले. फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब अशा सोशल मीडियावरती विव-विविध लोकांपर्यंत पोहोचून त्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली .उद्योग मंत्र मराठीचे उद्दिष्ट आहे की महाराष्ट्रातील लोकांना व्यवसायाबद्दल उत्कृष्ट मार्गदर्शन मिळावे व त्यांची व्यावसायिक प्रगती व्हावी. या हेतूने ही ब्लॉग वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे. आम्हाला आशा आहे की तुम्हाला या वेबसाईटवरील ब्लॉग्स मधून खूप काही नवनवीन गोष्टी शिकायला मिळतील.

“उद्योगमंत्र मराठी” हा सोशल मिडिया ग्रुप सर्वस्वी पणे मराठी उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी बनविलेला आहे. या द्वारे आपणांस सोशल मीडिया ऍडव्हरटायझिंग, ब्रॅण्डिंग, लोगो डिझायनिंग , ट्रेड मार्क रेजिस्ट्रेशन त्याचसोबत फूड प्रोसससिंग व मॅन्युफॅकचरिंग यावर संपूर्ण मार्गदर्शन पुरविले जाते. मराठी तरुणांना आर्थिक नियोजनासोबत मानसिक व व्यवसायिक मार्गदर्शन करणे हि काळाची गरज बनली आहे. सदर ग्रुप आपल्याला व्यवसायातील अत्यंत महत्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या पोस्ट्स द्वारे दररोज मार्गदर्शन पुरवतो. फेसबुक, इंस्टाग्राम व व्हाट्सअँप द्वारे आपल्याला कुठलेही शुल्क न आकारता मार्गदर्शन पुरविले जाते. त्याचसोबत फक्त आपल्या फर्म/ व्यवसायासाठी मार्गदर्शन हवे असल्यास आपल्याला पेड सर्व्हिसेस पुरवल्या जातात. उद्योगमंत्र मराठी अत्यंत कमी काळात सोशल मीडियावरील मार्गदर्शक ग्रुप म्हणून नावारूपाला येत आहे. आपण हि आपल्या व्यवसायाला नव्या उंचीवर पोहचवणार असाल तर आजच आमच्या सोशल मिडिया हॅन्डल ला फॉलो व लाईक करा. एक मराठी यशस्वी उद्योजक म्हणून यायचा मानस असेल तर उद्योगमंत्र मराठी हा तुमचा सारथी नक्की ठरेल.
– Manoj Ingale
Founder- उद्योगमंत्र मराठी
